उगमस्थान : त्र्यंबकेश्वर लांबी : 1450 किलोमीटर ( 900 मैल ) उगम स्थान उंची : 1620 मीटर ( 5310 फूट ) सरासरी प्रवाह : 3505 घन मी/से. मुख : काकीनाडा ( बंगालचा उपसागर ) पाणलोट क्षेत्रामधील राज्ये : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा उपनद्या : इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते. भीमा, वैनगंगा, इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात. गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्या पाण्यापैकी ८०% ...